सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरात रात्री – पहाटेच्या सत्रात दुसऱ्या टप्प्यात शहरातील विविध ठिकाणी 60 धोकादायक गतिरोधकांना पांढरे पट्टे मारून गांधी चौक भारत माता हॉटेल समोर रस्त्यावरील धोकादायक ग्रिट साफ केली. या उपक्रमात जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व देव्या सूर्याजी यांची साथ लाभली त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, लक्ष्मण कदम, रवी जाधव, समीरा खलील, सुजय सावंत, युवराज राऊळ, गौरव राजपूत यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाण्यासाठी परिश्रम घेतले. शहरातील जनतेकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक होत आहे.
स्वच्छ शहर व सुंदर शहर बनवण्यासाठी हातभार लावणे तसेच समाज हिताचे उपक्रम सातत्याने राबवणे हेच एक सामाजिक बांधिलकीचे उद्दिष्ट असणार आहे असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी सांगितले.