सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी शहरात काही दिवसांपूर्वी किरकोळ भांडणावरून एका फळ विक्रेत्याला छातिला पिस्तूल लावून धमकावण्याचा प्रकार सावंतवाडी शहरातील नासीर शेख यांच्याकडुन घडला होता. पूर्व वैमनस्यातून झालेल्या भांडणादरम्यान माजी नगरसेवक नसीर शेख यांनी स्वरक्षणाकरीता असलेली पिस्तूल भर बाजारपेठेत काढली होती. समोरील व्यक्तीन कटरचा मारा केल्यानं पिस्तूल काढल्याचं माजी नगरसेवक नसीर शेख यांचं म्हणनं होतं . मात्र सावंतवाडी शहरात भर बाजारात पिस्तूल काढल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी योग्य ती कारवाई व्हावी अन्यथा सावंतवाडी पोलीस स्टेशन समोरो आंदोलन करणार असं निवेदन सावंतवाडी पोलीस स्टेशनला दिलं होतं. रवी जाधव यांनी हे पिस्तूल जप्त करण्यात यावं आणि नसीर शेख यांना हद्दपार करण्यात यावं अशी मागणीही केली होती.
त्यानुसार माजी नगरसेवक नासीर शेख यांनी वापरलेले पिस्तुल आणि दुचाकी गाडी पोलीसांनी जप्त केली आहे. तसेच गुन्ह्याचा पुढील तपास सुरु असुन त्यांच्या विरुध्द हद्दपारीची प्रक्रिया सुरु आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांना दिली आहे.