सावंतवाडी प्रतिनिधी: चौकूळ येथील निराधार. मुलगा सुरज कृष्णा राऊळ हा इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे. याला शैक्षणिक साहित्याचे किट कलंबिस्त येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू कदम यांनी देऊन समाजासमोर एक नवा पायांडा घालून दिला आहे. सावंतवाडी कामानिमित्त आलेले नंदू कदम यांना हा निराधार मुलगा सुरज राऊळ सावंतवाडीत मिळाला. तो आपल्या नातेवाईकांकडे कारीवडे येथे राहत आहे. तो इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असून त्याला शैक्षणिक साहित्यची आवश्यकता होती. नंदू कदम यांच्याजवळ ही व्यथा त्यांनी मांडताच तात्काळ सामाजिक कार्यकर्ते नंदू कदम यांनी कुठलाही आढावेढा न घेता त्याला शैक्षणिक किट उपलब्ध करून दिले. नंदू कदम यांनी या शालेय शिक्षण घेत असलेल्या निराधार मुलाच्या पाठीमागे उभे राहत त्याला सर्व शैक्षणिक सुविधांसाठी आपण यापुढेही सहकार्य करू असे आश्वासन दिले.
सुरज राऊळ हा मुलगा आरपीडी हायस्कूलमध्ये शिकत आहे. नंदू कदम यांच्या या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
फोटो: सावंतवाडी सामाजिक कार्यकर्ते नंदू कदम यांनी निराधार सुरज राऊळ याला शैक्षणिक किट देताना