अक्कलकोट प्रतिनिधी: प्रत्त्येक शनिवार, रविवारच्या साप्ताहीक सुट्टयांमुळे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थाचे मुळस्थान असलेले श्री.वटवक्ष स्वामी महाराज देवस्थान भाविकांच्या गर्दीमुळे गजबजून जात आहे. अलीकडील काळात याची प्रचिती नेहमीच येत आहे. देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रयत्नातून गर्दीतही भाविकांना कमीत कमी वेळात सुलभ स्वामी दर्शनाचा लाभ होत असल्याचे मनोगत नाशिक येथील निस्सीम स्वामी भक्त ॲड.सुहास खर्डे यांनी व्यक्त केले. आज साप्ताहीक सुट्टयांचे औचित्य साधून स्वामी भक्त ॲड.सुहास खर्डे यांनी आपल्या कुटूंबासमवेत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री. स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने भाविकांसाठी असलेल्या स्वामी दर्शनाचे नियोजन पाहून ॲड.सुहास खर्डे बोलत होते. पुढे बोलताना ॲड.सुहास खर्डे यांनी स्वामी भक्ती प्रचार, प्रसाराचे कार्य व आध्यात्मिक जीवनाची कास धरून मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी मंदीरात भाविकांसाठी सुलभ स्वामी दर्शनाच्या नियोजनासोबतच आध्यात्माच्या उन्नती करीता मंदीरात भजन, कीर्तन, हरीनाम सप्ताह, पायी चालत येणाऱ्या दिंडी व पालखी सोहळ्यामधील भाविकांसाठी विवीध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याबद्दल स्वामीनामाचा प्रचार व प्रसार मोठया प्रमाणात होत आहे. मंदीर समितीच्या यासह अन्य सर्व धोरणात्मक कार्याचा प्रसार पाहून स्वामी भक्तांची संख्या वाढत आहे.


वयोवृद्ध व विकलांग भाविकांसाठी व्हीलचेअरच्या माध्यमातून तसेच महीला व पुरुष भाविकांची स्वतंत्र रांगेतून स्वामी दर्शनाची सोय करून मोठे पुण्यकार्य करीत आहेत. या सर्व पाश्वभुमीवर साप्ताहिक सुट्टयांमुळे वटवृक्ष मंदीरात स्वामींच्या दर्शनाकरीता प्रचंड गर्दी होत असल्याचे सांगून या माध्यमातून स्वामी भक्त व मंदीर समितीचा सलोखा वाढत असल्याचे मनोगतही ॲड.सुहास खर्डे यांनी व्यक्त केले. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.







