Home स्टोरी सात सप्टेंबरपर्यंत हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जाहीर!

सात सप्टेंबरपर्यंत हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जाहीर!

130

४ सप्टेंबर वार्ता: येत्या सात सप्टेंबरपर्यंत हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. यावर्षी मान्सूनच्या पावसाने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात केली. त्यानंतर जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. मात्र पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. पावसाच्या अधूनमधून येणाऱ्या एक दोन सरी सोडल्यास ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. या दोन महिन्यातील पावसाचा परिणाम खरिप पिकाच्या हंगामावर झाला आहे.

आता सप्टेंबर महिना सुरु झाल्यापासून पावसाचे पुनरागन झाले आहे. गेल्या दोन दिवसात पनवेल, खालापूर आणि कर्जत येथे सर्वात जास्त पाऊस झाला आहे. मात्र यावर्षाच्या मान्सूनना गेल्या तीन महिन्यातील सरासरी गाठता आलेली नाही. मात्र आता पावसाचे पुनरागमन होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. येत्या सात सप्टेंबरपर्यंत हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे.