Home स्टोरी सातुळी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ प्रथम…! सातुळी स्वराज्य ग्रुप...

सातुळी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ प्रथम…! सातुळी स्वराज्य ग्रुप व ग्रामस्थांचे आयोजन .

33

सावंतवाडी (सातुळी): सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या खुल्या भजन स्पर्धेत नेरूरच्या श्री मोरेश्वर प्रासादीक भजन मंडळ (बुवा भार्गव गावडे) याने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत कोंडुरा येथील श्री देव सिद्धेश्वर प्रासादीक भजन मंडळ (बुवा वसंत पेडणेकर) याने द्वितीय क्रमांक, पिंगुळीच्या श्री महापुरुष प्रासादीक महिला भजन मंडळ (बुवा प्रसाद आंबडोसकर) याने तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी भोगवेच्या श्री महापुरुष प्रासादीक भजन मंडळ (बुवा तुषार खुळे) यांची निवड करण्यात आली.

           या भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, चौकुळचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे, मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, गोसोर्स कंपनीचे सीईओ संतोष कानसे, सरपंच सोनाली परब, उपसरपंच स्वप्निल परब, माजी सरपंच उत्तम परब, आंबोली पोलीस अंमलदार दत्तात्रय देसाई, सामाजिक कार्यकर्ते दया परब, पोलीस पाटील आबा परब, पोलीस पाटील अरुण परब, शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत गावडे, दाणोली माजी उपसरपंच प्रशांत सुकी, भजन स्पर्धेचे परीक्षक संजय दळवी, डॉ. दादा परबआदी मान्यवर उपस्थित होते.

द्वितीय क्रमांक

स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे: उत्कृष्ट गायक – दुर्गेश मिठबावकर श्री सिद्धिविनायक प्रासादीक भजन मंडळ कणकवली, उत्कृष्ट हार्मोनियम – कु. प्रथमेश मोरजकर श्री ब्राह्मणदेव दत्तप्रसाद भजन मंडळ मळेवाड, उत्कृष्ट पखवाज – प्रणव मेस्त्री श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ नेरूर, उत्कृष्ट तबला – कु प्रदीप वाळके श्रीदेवी माऊली भजन सेवा संघ इन्सुली, उत्कृष्ट झांज – कु आर्यन आईर श्री चिंतामणी प्रासादी क भजन मंडळ वायंगणी सुरंगपाणी, उत्कृष्ट कोरस – श्री. ब्राम्हणदेव प्रासादीक भजन मंडळ ( मळेवाड), उत्कृष्ट साई बाबा गजर – श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ वर्दे (बुवा नरेंद्र मेस्त्री)  प्रसिद्ध दशावतार हार्मोनियम वादक कै. श्री. सुभाष लक्ष्‍मण परब यांच्या स्मरणार्थ सातुळी मधलीवाडी देवीचा मांड या ठिकाणी आयोजित केलेल्या या स्पर्धेला भजन रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील नऊ वजन मंडळांना निमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी गोसोर्स कंपनीचे सीईओ संतोष कानसे, सीओओ राहुल मिश्रा, सिनियर व्ही पी नटवर शर्मा व इतर टीमचे सहकार्य लाभले तर नियोजन हरिकृष्ण ( बाळू ) कानसे, स्वप्निल परब, अनिल सावंत, संतोष कानसे, गोविंद कानसे तसेच स्वराज्य ग्रूपचे पदाधिकारी यांनी केले.

या भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा स्वराज्य ग्रुप चे सर्व पदाधिकारी व सातुळी ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १०००१ रूपये, ७००१ रुपये, ५००१ रुपये तर उत्तेजनार्थ पारितोषिक श्री महापुरुष प्रासादीक भजन मंडळाला ३००१ रुपये, तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट हार्मोनियम कु. प्रथमेश मोरजकर याला दशावतार स्वरानंद पुरस्कार आणि उत्कृष्ट गायक दुर्गेश मिठबावकर याना राजयोग लक्ष्मी पुरस्कार या विशेष पुरस्कारासह प्रत्येकी २०२५ रुपयाचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच भजन स्पर्धेतील कोरस श्री. ब्राम्हणदेव प्रासादीक भजन मंडळ, झांज कु आर्यन आईर, तबला कु प्रदीप वाळके, उत्कृष्ठ साई गजर श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ व पखवाज वादक प्रणव मेस्त्री यांना प्रत्येकी १००० रुपयाचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक शुभम धुरी यांनी तर प्रास्ताविक श्रीराम कानसे आणि आभार स्वप्निल परब यांनी मानले.