मसुरे प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी रविवारी मसुरे गावचे सुपुत्र व कल्याण डोंबिवली भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नंदू परब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मंत्री महोदयांचे औक्षण सौ. गीतांजली घनशाम परब यांनी केले. नंदू परब यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी घनश्याम परब, अथर्व परब, भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सचिव अतुल काळसेकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, डॉ. सुधीर मेहेंदळे, पुरातत्त्व विभागाचे डायरेक्टर तेजस गर्गे, सहाय्यक संचालक विलास वहाणे,मंत्री महोदयांचे ओएसडी शरद डोके, बंडू गावडे , रोहेश गावकर, यासीन सय्यद, जगदीश चव्हाण, तात्या हिंदळेकर, पोलीस पाटील अभी दुखंडे आदी उपस्थित होते. यावेळी नंदू परब यांनी गावातील विविध विकासात्मक प्रश्नांबाबत तसेच भरतगड किल्ल्याच्या पर्यटन दृष्ट्या विकसित अशा कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना केली.. तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नंदू परब यांच्या कल्याण डोंबिवली येथील कामाचे विशेष कौतुक केले..
Home स्टोरी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी घेतली भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या निवासस्थानी...







