सिंधुदुर्ग: सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव २०२३ चा समारोप आज माजी अध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसा दिनी खुली निबंध स्पर्धा बक्षीस वितरणाने करण्यात आला. निबंध स्पर्धेचा विषय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर घेण्यात आली होती. या निबंध स्पर्धेत प्रथम सावंतवाडीतील नारायण उर्फ अरुण जगन्नाथ वझे यांना रोख एक हजार रुपयांचे पारितोषिक माजी आमदार राजन तेली व संजू परब यांच्या हस्ते देण्यात आले.
या पारितोषिक वितरण कार्यक्रमात माजी खासदार निलेश राणे, संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, अध्यक्ष रवींद्र मडगावकर, कार्यवाहक ॲड. संतोष सावंत, सचिव प्रताप परब, प्रल्हाद तावडे, विजय चव्हाण, प्रमोद सावंत, शशिकांत मोरजकर, मोहिनी मडगावकर, जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, प्रमोद कामत आदींच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी द्वितीय इन्सुली येथील सौ विशाखा विश्राम पालव, तृतीय मालवण येथील शर्वरी प्रमोद प्रभू मिराशी, उत्तेजनार्थ संपदा प्रमोद सावंत, सावंतवाडी आरपीडी हायस्कूल जूनियर कॉलेज भिकाजी राजेंद्र देसाई, बांदा खेमराज हायस्कूल शालेय गट उत्तेजनार्थ अदिती, किशोर, रावराणे यांना रोख सातशे पाचशे व दीडशे रुपये असे पारितोषिक माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी बांदा मालवण कुडाळ दोडामार्ग आधी भागातून शालेय व खुल्या गटातून निबंध आले होते.
या निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परीक्षक कारिवडे हायस्कूलच्या माध्यमिक शिक्षिका अर्चना सावंत व देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांनी काम पाहिले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मान्सून महोत्सव २०२३ चा समारोप बक्षीस वितरणे करण्यात आला.
फोटो: सावंतवाडी सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव २०२३ च्या निबंध स्पर्धेत प्रथम विजेते नारायण उर्फ अरुण वझे यांना पारितोषिक देताना माजी आमदार राजन तेली, बाजूला संजीव परब, चेअरमन मनीष दळवी, सुनील राऊळ, रवींद्र मडगावकर, चेअरमन बाबुराव कविटकर आधी.
छाया: भारत फोटो स्टुडिओ