सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री फाउंडेशन २०२४ मान्सून महोत्सव निमित्ताने वकृत्व सुदृढ बालक, रान भाजी, गायन स्पर्धा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध स्तरावर हे फाउंडेशन उपक्रम राबवित आहे. भविष्यात हे फाउंडेशन आजच्या युवाईला आरोग्य शिक्षण व सन्मान च्या दृष्टीने उपक्रम राबवणार आहे. असे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी मान्सून महोत्सव शुभारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त केले. सह्याद्री फाउंडेशन चा २७ जुलै ते १९ ऑगस्ट कालावधीत मानसून महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ शैक्षणिक उपक्रमाद्वारे कलंबिस्त येते शनिवारी शानदार पद्धतीने करण्यात आला. वकृत्व स्पर्धेने महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला आहे. कलंबिस्त हायस्कूल येथे मानसन महोत्सवानिमित्त वकृत्व स्पर्धा व शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत मुलांचा गौरव सन्मान सोहळा आयोजित करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, व्हाईस चेअरमन चंद्रकांत शिरसाट, फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर, सचिव प्रताप परब, कलंबिस्त आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन दीननाथ सावंत, कॅप्टन सुभाष सावंत, कॅप्टन अरुण सावंत, सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, शिक्षण संस्थेचे सचिव यशवंत उर्फ बाबा राऊळ, उपसरपंच सहदेव राऊत, केंद्रप्रमुख गुंडू सावंत, परीक्षक भरत गावडे, प्रदीप सावंत, सचिव प्रताप परब, माजी सचिव प्रल्हाद तावडे, सुहास सावंत. शशिकांत मोरजकर, गजानन बांदेकर, दीपक राऊळ, विठ्ठल बिडवे, अनिल राऊळ, राजेश पास्ते, सिद्धेश सावंत सुभाष देसाई. माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, बाबू सावंत, अनंत सावंत, प्रकाश सावंत, बाळा राजगे, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, रामा माडगूत आधी उपस्थित होते.
यावेळी दीप प्रज्वलन ने महोत्सव चे उद्घाटन बाबुराव कविटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री राऊळ म्हणाले, सह्याद्री फाउंडेशन चा महोत्सव म्हणजे एक वेगळीच सामाजिक सांस्कृतिक पर्वणी असते. यावर्षी आम्ही ग्रामीण भागात सह्याद्रीच्या पट्ट्यात महोत्सवाचे आयोजन केले आहे. सावंतवाडी नगरपालिका आणि सह्याद्री फाउंडेशन यांच्यावतीने विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. १९ ऑगस्टला या महोत्सवाचा समारोप सावंतवाडीत होणार आहे विविध स्पर्धा आहे त्यामध्ये अधिकाधिक जणांनी भाग घ्यावा असे आव्हान त्यांनी केले यावेळी प्राथमिक शाळेतील ३० विद्यार्थ्यांना दप्तर वाटप व दहावी व बारावी पास विध्यार्थी खुशी रावळ, मंजुषा राहुल, विद्या राहुल, समीक्षा गावडे, दिव्यांक सावंत, श्रद्धा सांगेलकर या पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी केले. तर सूत्रसंचालन संस्थेचे कार्यप्रमुख एडवोकेट संतोष सावंत यांनी. आभार माजी सचिव प्रल्हाद तावडे यांनी मानले.