सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील सह्याद्री फाउंडेशन तर्फे दरवर्षी घेण्यात येणारा .पावसाळी हंगामातील मान्सून महोत्सव २७ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या कालावधीत या मान्सून महोत्सवात आरोग्यमंथन शिक्षण निबंध व रानभाज्या स्पर्धा, माता बाल संगोपन, साहित्य वाटप, पर्यावरण वृक्ष संवर्धन आधी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सह्याद्री फाउंडेशन तर्फे गेल्या पाच-सहा वर्षांपासून मान्सून महोत्सव घेण्यात येतो. कोरोना महामारीच्या काळात गेली. दोन वर्ष मानसून महोत्सव स्थगित होता. मात्र आता यंदा पुन्हा एकदा सह्याद्री फाउंडेशन आयोजित मान्सून महोत्सव २०२३ भरवण्यात येणार आहे. अशी माहिती सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ व माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब व अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी संयुक्त पणे दिली आहे. या मान्सून मोहत्सव संदर्भात फाउंडेशन ची बैठक झाली. या बैठकीत मान्सून महोत्सवाच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.
२६ जुलैला सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांशी संवाद त्यांच्या अडीअडचणी आणि त्यांना फळ वाटप, २७ जुलैला मान्सून महोत्सवाचा शुभारंभ सकाळी ११ वाजता हॉटेल पलॅ पर्यटन स्वागत केंद्र गार्डन जवळ, त्यानंतर दुपारी बारा वाजता आरोग्य मंथन, आपल्या आरोग्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि खाण्याचे नियोजन संदर्भात श्रीमती विनया बाड यांचे मार्गदर्शन, ६ ऑगस्ट कोकणातील आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंदमुळे रानभाज्या पावसाळी ऋतूतील भाज्या यांचं प्रदर्शन स्पर्धा. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा हॉटेल पल् येथे ९ ऑगस्ट बेबी किड्स तर्फे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व सावंतवाडी जानकीबाई सुचिताग्रह येथील बालकांना साहित्य वाटप व त्यांच्या आरोग्याची काळजी या संदर्भात माता संगोपन चर्चा दुपारी बारा वाजता, १५ ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने खुली निबंध स्पर्धा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध स्पर्धेचा विषय जवळपास १००० शब्द मर्यादा, निबंध स्वहस्ताक्षर सुंदर अक्षरात फुलस्कॅपवर लिहून पाठवू शकता, निबंध पाठवण्यासाठी १४ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोस्टाने अथवा स्वतः आणून देऊ शकता. निबंध देण्याचे ठिकाण रामेश्वर प्लाझा, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या संपर्क कार्यालय येथे, १८ ऑगस्ट उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप व तेथील डॉक्टरांशी संवाद १९ ऑगस्ट सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे समारोप, सकाळी ११ वाजता यानिमित्ताने शैक्षणिक उपक्रम आणि स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ. तरी या मान्सून महोत्सव विविध स्पर्धा उपक्रमामध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे सावंतवाडी येथील सैनिक नागरी सहकारी पतसंस्था गवळी तिठा येथे माजी अध्यक्ष प्रल्हाद तावडे यांच्याकडे द्यावीत.
तसेच रानभाज्या स्पर्धा उपक्रमासाठी विभावरी सुकी व मोहिनी मडगावकर यांच्याकडे नावे द्यावी. या बैठकीत सह्याद्री फाउंडेशनचे कार्यवाहक ॲड संतोष सावंत, सचिव प्रताप परब, उपाध्यक्ष विभावरी सुकी, मोहिनी मडगावकर, माजी सभापती प्रमोद सावंत, माजी अध्यक्ष प्रल्हाद तावडे, माजी सचिव सुहास सावंत, संदीप सुकी मोहिनी मडगावकर आधी उपस्थित होते. तरी मोठ्या संख्येने या मान्सून महोत्सव उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.