सावंतवाडी प्रतिनिधी: आपले आरोग्य सुदृढ आणि चांगले असायला हवे तर प्रत्येक व्यक्तीने क ची बाराखडी चे पालन करायला हवे. चार पांढरे पदार्थ आपल्या आहारातून नेहमी बाजूला सारायला हवेत. आहाराची चार सुत्री योग्य पद्धतीने पाळली गेली तर आपण कुठल्याही आजार आपल्या जवळ येणार नाही. आपण काय खायचे काय खाऊ नये ही क ची बाराखडी आपल्या रोजच्या आहारात अत्यंत गरजेची आहे. पांढरे पदार्थ, साखर, मीठ, मैदा, डालडा यांना मुक्ती द्या असे आहार तज्ञ श्रीमती विनया बाड यांनी आरोग्याचे मंथन या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले. त्यांनी आपल्या रोजच्या आहारात काय असायला हवे आणि काय नको याची चार सूत्री स्पष्ट केली.
सावंतवाडी येथील सह्याद्री फाउंडेशन तर्फे मान्सून महोत्सव २०२३ २७ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या मान्सून महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी आरोग्याचे मंथन अन आहार याविषयी व्याख्यान चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यान मध्ये आहार तज्ञ श्रीमती बाड यांनी आहाराविषयी व स्वतःच्या आरोग्याविषयी प्रत्येक व्यक्तीने काय सूत्र पाळायला हवे हे स्पष्ट केले. या महोत्सवाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ व सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर यांच्या हस्ते करण्यात आला. सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, कार्यवाहक ॲड संतोष सावंत, माजी सभापती प्रमोद सावंत, उपाध्यक्ष सौ विभावरी सुकी, माजी अध्यक्ष विजय चव्हाण, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, राजू तावडे, गजानन बांदेकर, संदीप सुकी, जॉय डान्टस, दीपक राऊळ, विठ्ठल बिडये आदी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य मंथन व आहाराच्या पद्धती याविषयी बोलताना श्रीमती बाड पुढे म्हणाल्या मी गेली पंधरा वर्षे आहार तज्ञ म्हणून कार्यरत आहे. माझ्याकडे अनेक जण आहार विषयी येतात आहार आणि व्यायाम हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीने दिवसाला एक तास तरी व्यायामाला द्यायला हवा. मला वेळ नाही म्हणून चालत नाही. आपले आरोग्य जर सुदृढ असेल तर आपण चांगले जीवन जगू शकू. आजच्या धकाधकीच्या काळात तुमचे आहार योग्य असायला हवे. आहारामध्ये चार सुत्री आहे. ही जर सूत्री तंतोतंत पाळली गेली तर तुम्ही पहिल्या फेरीत पास झाला असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा पोटाचा घेर वाढतो तेव्हा तुम्ही अनेक आजाराला निमंत्रित करीत आहात तेव्हा पोटाचा घेर वाढवू देऊ नका. जेव्हा तुम्ही क ची बाराखडी पळाल म्हणजेच आपण काय खायला हवे, काय खायला नको ही बाराखडी तंतोतंत आहारात महत्त्वाचे आहे. चार पांढरे पदार्थ नेहमी तुमच्या पासून दूर ठेवा. वय वर्ष १८ ते ३५ पर्यंत तुमची ह्युमॅनिटी पॉवर्स अधिक असते पण जेव्हा तुमचे वय ४० पार करता तेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याची क ची बाराखडी पाळायलाच हवी. तुमची जर हिम्म्यानिटी म्हणजे प्रतिकारशक्ती ही चांगली असायला हवी त्यासाठी आहार महत्त्वाचा आहे. पुरुषाचे वजन ७२ ते ८० कमीत कमी आणि स्त्रीचे वजन ५२ ते ६ या दरम्यान असायला हवे. ते वाढू देऊ नका. तुमचे हात पाय मेंदू यांची चालना गती वाढवायला हवी. म्हणजे तुम्ही रोज एक तास व्यायाम करणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या रचनेनुसारच त्याचा आहार आणि व्यायाम हा महत्त्वाचा आहे. आहाराविषयी युट्युब व सोशल मीडिया वर आपण पाहून आपले आहार व व्यायाम करतो खरंतर आहाराविषयी प्रत्येक व्यक्तीच्या शरीर रचनेनुसारच आहार त्याला कसा हवा? काय हवा? हे पाहिल्यावरच ठरले जाते आजच्या या युगात फूड फास्ट आणि मैद्याचे पदार्थ आपण घरात नेहमी ठेवतो आणि मुलांनाही ते देतो हे मैद्याचे पदार्थ दूर ठेवा. तुम्ही रोज संतुलित आहार पालेभाज्या खा. आरोग्य मंथनाची सूत्रे चे योग्य पालन केले की तुम्ही आपोआपच तुमच्या पासून रोगाला मुक्ती मिळू शकता आरोग्य व आहाराविषयी त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली.
यावेळी उद्घाटक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राऊळ यांनी रोज सकाळी चालणे हा उत्तम मार्ग आहे. प्रत्येक व्यक्तीने चालणे आणि व्यायाम कडे लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही आजच्या काळात तरुण पिढी डायबिटीस आणि हार्ट अटॅक बीपी अशा चक्रात अडकली आहे. त्यांच्या साठी आम्ही हे आरोग्यमंथन व आहार पद्धती याविषयी व्याख्यान आयोजित केले आहे. असे ते म्हणाले.
यावेळी अध्यक्ष रविंद्र मडगावकर यांनी मान्सून महोत्सव हा आरोग्य शिक्षण व रानभाज्या अशा विविध उपक्रमातून साजरा करण्याच्या आम्ही ठरवले आहे. त्याचा आज शुभारंभ झाला आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड संतोष सावंत तर आभार प्रल्हाद तावडे यांनी मानले. सह्याद्री फाउंडेशनच्या मान्सून महोत्सव मध्ये खुली निबंध स्पर्धा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, तसेच रानभाज्या प्रदर्शन व स्पर्धा आधी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या महोत्सवात च्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो: सावंतवाडी सह्याद्री फाउंडेशनच्या मान्सून महोत्सव २०२३ च्या आरोग्य मंथन व आहाराच्या पद्धती सूत्र या विषयी व्याख्यानात बोलताना आहार तज्ञ श्रीमती विनया बाड, बाजूला संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, अध्यक्ष रवींद्र मडगावकर, उपाध्यक्ष विभावरी सुकी, ॲड. संतोष सावंत आधी








