Home स्टोरी सहकारातून उत्कर्ष साधता येतो..! शिवाजी पालव

सहकारातून उत्कर्ष साधता येतो..! शिवाजी पालव

270

इन्सुली प्रतिनिधी: इन्सुली सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्थेच्या वतीने दुग्ध उत्पादक शेतकऱ्याला गणेश चतुर्थी भेटवस्तू वाटप मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अभियंता शिवाजीराव पालव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना पालव म्हणाले संस्थेचा दरवर्षी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना भेटवस्तू देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. हे सहकारातून निर्माण झालेली दुग्ध संस्था दुध संकलन करूनशेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम संस्था राबवते हे कौतुकास्पद आहे. या दूध संकलनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मोठा फायदा होण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. एकटा माणूस मोठा होत नाही. तर सर्व मिळून एकत्र आलो तर फार मोठे कार्य होते हे या संस्थेने दाखवून दिले आहे आपला उत्कर्ष हा सहकारातून होत असतो. यासाठी सहकार आणि एकत्र येणे फार मोठे योगदान आहे.

प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष पेडणेकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. आज या संस्थेच्या वतीने दोन संकलन केंद्र दुग्ध संकलन करतात ६५० लिटर दूध संकलन दिवसाला केले जाते. येत्या वर्षभरात एक हजार लिटर दूध संकलन करण्याचा आमचा संचालक मंडळाचा मनोदय आहे. दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा तसेच जिल्हा बँकेचा फायदा घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी.

यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी पालव, इन्सुलि विकास संस्थेचे चेअरमन साबाजी परब, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर,सचिव संजय सावंत, उपाध्यक्ष सहदेव सावंत, खजिनदार सखाराम बागवे, सदस्य सौ गीतांजली हळदणकर, सुधीर गावडे, विलास गावडे, तसेच दुग्ध उत्पादक शेतकरी बाबाजी देसाई,नारायण राणे मंगेश चराठकर, प्रसाद सावंत, दिलीप नाईक, राजन धुरी, गौरेश हळदणकर, वासुदेव हळदणकर, संतोष परब, सिताराम गावडे, ऊपरकर, सौ प्रगती गावडे, तसेच दुग्ध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ पेडणेकर यांनी तर आभार संजय सावंत यांनी मानले.