Home स्टोरी सलोखा योजनेअंतर्गत प्रकरण दुय्यम निबंधक मालवण यांजकडे सादर.

सलोखा योजनेअंतर्गत प्रकरण दुय्यम निबंधक मालवण यांजकडे सादर.

197

महसूल सप्ताह अंतर्गत कोळब मंडळ कार्य शेत्रात विशेष कार्यक्रम….

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): महसूल सप्ताह अंतर्गत दिनांक ०४ ऑगस्ट रोजी जनसंवाद मध्ये मंडळ कोळंब मधील गाव गावकरवाडा येथील सलोखा योजनेअंतर्गत प्रकरण दुय्यम निबंधक मालवण यांजकडे नोंदविण्यात आले. सदर योजनेअंतर्गत प्रकरण रजिस्टर नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी कोळंब श्रीमती मीनल चव्हाण व तलाठी हडी श्रीमती प्रीतम भोगटे यांना श्रीमती वर्षा झालटे तहसीलदार मालवण व निवासी नायब तहसीलदार श्री कोकरे रावसाहेब तसेच दुय्यम निबंधक मालवण यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभलेयावेळी सदर योजनेचे लाभार्थी यांनी सर्वांचे आभार मानले..