Home स्टोरी सर्प दंशाने मुत्युमुखी पडलेल्या गौतम वाघ या मुलाच्या कुटूंबियांना शहर प्रमुख महेश...

सर्प दंशाने मुत्युमुखी पडलेल्या गौतम वाघ या मुलाच्या कुटूंबियांना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिली ५० हजारांची आर्थिक मदत!

190

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड):- श्री मलंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या आंबेगांव पाड्यातील गौतम बाळू वाघ या १८ वर्षीय मुलाचा सर्प दंशाने दुदैवी मृत्यु झाला. वाघ कुटूंबियांवर कोसळलेल्या या संकटातून सावरण्यासाठी आणि कुटूंबाला अल्पसा आर्थिक दिलासा मिळावा या उद्देशाने शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी या कुटुंबाला ५० हजार रुपयांची मदत करीत या कुटुंबाचे सांत्वन केले. सर्प दंशाने मृत्युमुखी पडलेला १८ वर्षीय गौतम वाघ हा मुलगा मिळेल ती मोलमजुरी करून आपल्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह करीत होता. अल्प वयातच मृत्युमुखी पडलेल्या गौतमच्या पश्चात त्याची वृद्ध आई व वडील असून वडील हे दिव्यांग आहेत, मुलाच्या अशा प्रकारे झालेल्या अनपेक्षीत निधनाने हे कुटुंब दु :खी व हतबल झाले असून मुलाच्या मृत्युमुळे या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुदैवी कुटूंबाची महेश गायकवाड यांनी भेट घेवून त्यांना धिर दिला व अल्पशी आर्थिक मदत म्हणून स्व.गौतम वाघ याचे वडील बाबु धर्मा वाघ यांचेकडे पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला.

यासमयी अंबरनाथ तालुका प्रमुख जैनु जाधव, उपतालुका प्रमुख हिरामण पितळे, अंकुश पाटील, मंगरूळ गावचे सरपंच रवी पाटील, चिंचवलीचे ग्रामस्थ विलास पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते .