Home स्टोरी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल…!

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल…!

142

३१ डिसेंबर वार्ता: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी अभिनेते, उद्योजक, राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महनीय व्यक्तींबरोबरच देश-विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. राज्यात नववर्षाच्या स्वागताची पर्यटकांची धूम शनिवारी संध्याकाळपासूनच सुरु झालेली पाहायला मिळत होती. पणजी, म्हापसा, पर्वरी सारख्या किनाऱ्यालगतच्या शहरांमध्ये शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांतून अनेक वाहने गोव्यात दाखल झाली आहेत.

 

तसेच राज्यात काही ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने स्थानिक तसेच पर्यटकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. शनिवारी संध्याकाळ पासून किनारी भागातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात दिसून आली. विशेषतः सनबर्नला जाणाऱ्या वागातोर रस्त्यावर तर तर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

 

तसेच किनाऱ्या लगतच्या कळंगुट, बागा, मोरजी, हरमल, शिवोली, आश्वे सारख्या रस्त्यांवर २-२ तास वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस जागोजागी तैनात असूनही वाहतुकीचा बोजवारा उडालेला पाहायला मिळाला.

 

गोवा राज्यातील विविध समुद्रकिनारे, हॉटेल्ससहित रिव्हर क्रुज, तसेच कॅसिनो जहाजांवरही पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. मद्याच्या दुकानांवरदेखील खरेदीसाठी झुंबड दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पर्यटनस्थळे गजबजलेली आहेत. पार्ट्या, मोठ-मोठ्या मेजवान्यांचे आयोजन नववर्ष स्वागतासाठी होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे