Home स्टोरी सरकारने चालू केलेल्‍या ७७८ पैकी ७०० योजना जनतेला ठाऊक नाहीत ! विरोधी...

सरकारने चालू केलेल्‍या ७७८ पैकी ७०० योजना जनतेला ठाऊक नाहीत ! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

137

१२ ऑगस्ट वार्ता: सध्‍याच्‍या सरकारने मोठा गाजावाजा करत चालू केलेल्‍या ७७८ योजनांपैकी ७०० योजनांची माहिती जनतेला नाही. या योजना प्रत्‍यक्षात कागदावरच दिसत आहेत. बहुसंख्‍य लोकांपर्यंत या योजना पोचल्‍याच नाहीत, तसेच अनेकांना तर त्‍या ठाऊकही नाहीत. त्‍यामुळे हे सरकार बोलघेवढेपणा करत असून ‘शासन आपल्‍या दारी’ असे विविध उपक्रम शासन राबवत असले तरीही याचा कुणालाही लाभ होत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ९ ऑगस्‍ट या दिवशी येथे केली.