Home स्टोरी समृद्धी महामार्ग बनतोय मृत्यूचा साफळा?

समृद्धी महामार्ग बनतोय मृत्यूचा साफळा?

160

१४ मे वार्ता: समृद्धी महामार्गावर प्रवास करतांना गेल्या १५० दिवसात ९५० च्यावर अपघात झाले आहेत. या अपघातात जवळपास ४० जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने याची गंभीरतेने दखल घेत एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी तत्काळ एक तज्ज्ञांंचं पथक या महामार्गावर झालेल्या मोठ्या अपघात स्थळी निरीक्षण करण्यासाठी पाठविलं आहे. या पथकात तज्ज्ञांंसह, वरिष्ठ परिवहन अधिकारी, वाहतूक पोलिस अधीक्षक सामील झाले होते. या पथकाने अलीकडेच समृद्धी महामर्गाच्या मोठे व जीवित हानी झालेल्या अपघात स्थळांचं प्रत्यक्ष अपघातस्थळी जाऊन निरीक्षण केलं. निरीक्षण पथक आता लवकरच याचा अहवाल एमएसआरडीसीला सादर करून अपघात रोखण्यासाठी अजून नवीन काही उपाय योजना करणार आहे.