Home स्टोरी समुद्री व्यापार, पर्यटन व औद्योगिक क्षेत्राची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती! केंद्रीय मंत्री...

समुद्री व्यापार, पर्यटन व औद्योगिक क्षेत्राची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

97

रायगड जिल्ह्यात पळस्पे येथे ४१४.६८ कोटी रुपये किंमतीच्या व ६३.९०० किलाे मीटर लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री उदय सामंत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्री नितीन गडकरी यांनी भूमिपूजन केले.

यावेळी बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्याला लाभलेल्या जेएनपीटी व दिघी या दोन समुद्री बंदरांचे देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान आहे. हे प्रकल्प स्थानिक तसेच राष्ट्रीय विकासात भरीव योगदान देत आहेत. समुद्री व्यापार, पर्यटन व औद्योगिक क्षेत्राची प्रगती म्हणजेच देशाची प्रगतीसमुद्री व्यापार, पर्यटन व औद्योगिक क्षेत्राची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती आणि ही प्रगती साध्य होऊ शकते ते मजबूत रस्त्यांच्या जोडणीतून. पनवेल ते कासू या महामार्गाच्या काँक्रिटीकरणामुळे प्रवास गतीमान होईल तसेच वेळेची व इंधनाची बचत होईल. वाहन चालवण्याच्या व देखभालीच्या खर्चात कपात होईल. जेएनपीटी व दिघी या दोन महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा हा मार्ग असल्याने यामुळे जल वाहतूक विकासाला चालना मिळेल.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ हा कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळेल. प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा हा मार्ग असल्याने औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. तसेच कृषी, फलोत्पादन वाहतूक सुलभ होऊन व्यवसायाला चालना मिळेल. सुधारित रस्ता सुरक्षा प्रणालीमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. हे प्रकल्प जिल्ह्याच्या, राज्याच्याच नाही तर देशाच्या व्यापारवृद्धीत व सर्वसमावेशक प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलतील.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मंत्री गडकरींनी १५ हजार कोटी रुपयांच्या नवीन तीन प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये कळंबोली जंक्शन हा १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प, पागोडे जंक्शन चौक ते ग्रीनफील्ड महामार्ग हा १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प आणि मोर्बे – करंजाडे हा जेएनपीटीवरून जाणारा १३,००० कोटी रुपयांचा दिल्लीला जोडणारा महामार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल अशी ग्वाही मंत्री गडकरी यांनी दिली.

दरम्यान मुंबई गाेवा रस्त्यावरुन मंत्री गडकरी यांनी सांगितलं की, माझी आणि माझ्या खात्याची जबाबदारी आहे. झालं ते झाले हा महामार्ग लवकर पुर्ण हाेईल अशी ग्वाही देताे.