Home स्टोरी समीर वानखेडे यांना आज हजर राहण्याचा सीबीआयचा आदेश…..

समीर वानखेडे यांना आज हजर राहण्याचा सीबीआयचा आदेश…..

64

१८ मे वार्ता: एनसीबी मुंबई विभागाचे तत्कालीन विभागीय संचालक, भारतीय महसूल सेवेतील अधिकारी (IRS) समीर वानखेडे यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. ‘किंगखान’अभिनेता शाहरूख खान याच्याकडून २५ कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपापासून ते महागडी घड्याळं, परदेशी प्रवास यांचा हिशोबही समीर वानखेडे देऊ शकले नाहीत. या प्रकरणी समीर वानखेडे यांच्या विरोधात ११ मे रोजी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने आज गुरुवार दि. १८ मे रोजी त्यांना हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

गुन्हेगारी कट रचणं, धमकीद्वारे खंडणी मागणं, सरकारी कर्मचाऱ्यानं लाच घेणं, सरकारी कर्मचारी असल्याचा भ्रष्टाचारी आणि अवैध गोष्टींसाठी फायदा घेणं, मौल्यवान वस्तू कुणालाही न सांगता मिळवणं, आदी तक्रारी समीर वानखेडेंच्या विरोधात दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारीमध्ये समीर वानखेडे, विश्व विजय सिंग आणि आशिष रंजन या तीन एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.