Home स्टोरी समीर वानखडे यांच्या अडचणीत वाढ? आर्यन खान प्रकरण

समीर वानखडे यांच्या अडचणीत वाढ? आर्यन खान प्रकरण

110

१५ मे वार्ता: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनमधले माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करणं त्यांच्यासाठी अडचणीचं ठरत आहे. NCB व्हिजिलेन्सने २५ ऑक्टोबर २०२१ रोजी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आणि आता ११ मे रोजी CBI कडे आपला अहवाल सादर केला.आर्यन खान एनसीबीच्या आणि खास करून आरोपी आणि पंच असलेल्या किरण गोसावीच्या ताब्यात आहे, हे दाखवण्यासाठीच आर्यनचा ताबा के.पी. गोसावी यांना देण्यात आला होता. वानखेडे यांच्या आदेशानुसारच के. पी. गोसावी आर्यनला घेऊन एनसीबी कार्यालयात आला होता, असं सीबीआयच्या एफआयआरमध्ये नमदू करण्यात आलं आहे.

एनसीबीच्या कार्यपद्धतीच्या बाहेर असूनही एका पंचाला अशा कारवाईवेळी मुक्तपणे वावरण्याचे आणि एनसीबी कार्यालयात येण्याचे अधिकार वानखेडे यांनी दिले. आरोपी असलेले समीर वानखेडे आणि आशिष रंजन यांनी त्यांच्या घोषित केलेल्या मालमत्तेपेक्षा अधिक संपत्ती मिळवली.

समीर वानखेडे यांनी केलेल्या परदेश वारीचे म्हणावे तसे स्पष्टीकरण व्हिजिलन्स टीमच्या चौकशीत दिले नाही. महागडी घड्याळं आणि महागड्या गाड्या कुठून आल्या याचेही उत्तर देण्यात वानखेडे असमर्थ राहिले, असं सीबीआयने FIR मध्ये म्हटलं आहे. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट याच्याकडे जे चरस सापडलं ते सिद्धार्थ शाह या व्यक्तीकडून त्याने विकत घेतलं होतं. मात्र वानखेडे आणि इतर एनसीबी अधिकाऱ्यांनी या सिद्धार्थ शहा नावाच्या व्यक्तीला काहीही कारवाई न करता जाऊ दिलं, असा एनसीबीच्या दक्षता समितीचा अहवाल आहे. या क्रूझवर २७ लोक असताना फक्त १० जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. यामुळे समीर वानखडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे असे समजते.