Home स्टोरी समिर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होणार?

समिर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होणार?

63

१७ मे वार्ता: मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टीदरम्यान आर्यन खानला अटक करणारे समीर वानखेडे यांची सीबीआईकडून चौकशी सुरु आहे. सीबीआईने आपल्या चार्टशीटमध्ये आरोप केला आहे की, वानखेडे यांनी २ ऑक्टोबर २०२१ मध्ये आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात अडकण्यापासून वाचवण्यासाठी अभिनेता शाहरूख खानकडून २५ कोटींची लाच मागितली होती. शेवटी ही डिल १८ कोटींना नक्की करण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला आहे. समिर वानखेडे त्यावेळी वानखेडे मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे (NCB) झोनल डायरेक्टर होते.

SIT ने केलेल्या तपासानुसार, वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी मालदीव या टूरसाठी तब्बल साडे 5 लाख खर्च केले होते. एसआयटीच्या तपासानुसार, समीर वानखेडेने २०१८ मध्ये १७.४० लाख रुपयांचं एक रोलेक्सचं घड्याळ खरेदी केलं होतं. वानखेडेंनी दावा केला आहे की, त्यांना हे घड्याळ पत्नी क्रांतीने गिफ्ट केलं होतं. मात्र ज्यावेळी एसआयटीने क्रांतीचे तीन वर्षांचे आयकर रिटर्न तपासले त्यादरम्यान त्यांचं उत्पन्न २१ लाख रुपये होतं. वानखेडेंनी काही कारणास्तव त्यांच्याकडील चार महागडी घड्याळं कमी किमतीत विकली होती. कर्टियर या घडाळ्याची मूळ किंमत १०.६० लाख असून ६.४० लाखात विकण्यात आलं होतं. वानखेडे यांच्या मुंबईत ५ प्रॉपर्टी असून यातील काही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरही आहे. यामध्ये त्यांच्या नावाचा एक बारही आहे. द प्रिंटमधील माहितीनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे (NCB) झोनल डायरेक्टर म्हणून त्यांचा महिन्याचा पगार एक ते दीड लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळे या पगारात समीर वानखेडे यांना इतकी संपत्ती आणि आंतरराष्ट्रीय दौरे करणं कसं शक्य झालं, यावर चर्चा केली जात आहे.