कणकवली प्रतिनिधी: समाजकार्य कधीही कमी होत नाही आणि जनजागृती सेवा संस्था तर पाच जिल्ह्यात विविध माध्यमातून सामाजिक कार्य अविरतपणे करत आहे. त्यात्या भागातील समस्या जाणून घेऊन तसे कार्य करणारी संस्था महत्वाची ठरते. असे समाजहित घडविणाऱ्या या संस्थेचे कार्य असेच सुरू राहावे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त अधिकारी चंद्रशेखर उपरकर यांनी केले. ते कणकवली येथील जनजागृती सेवा संस्थेच्या राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अभिनेत्री अक्षता कांबळी, श्री चौडेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री धुमाळे, वास्को गोवा येथील कवयित्री, समुपदेशक शुभांगी गुरव, सामाजिक कार्यकर्ते राजू मानकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि गणेश प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी बोलताना अभिनेत्री अक्षता कांबळी म्हणाल्या की, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान निर्माण होत असेल तर त्याच्यापेक्षा मोठे समाधान कोणतेच नाही. नेमकेपणाने तेच कार्य या संस्थेच्या माध्यमातून मुंबईपासून सिंधुदुर्ग पर्यंत सातत्याने होत आहे. यावेळी राजश्री धुमाळे, शुभांगी गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.
समाजरत्नांचा गौरव
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महेश सावंत, निकेत नरहरी पावसकर, सहदेव धरणे, डाॅ. संजीव लिंगवत, अक्षय मेस्त्री, सुरेश कदम, दत्ताराम टोपले, राजेंद्र बिड्ये, निलेश गवंडी,दत्तप्रसाद आदिती सामंत, संध्या तेरसे, सागर तळवडेकर, मिहिर मठकर, संतोष टक्के प्राची तावडे, अजय गुरसाळे यांना सन्मानपत्र,संस्थेचा अहवाल,आरती संग्रह, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांमधून दत्ताराम टोपले, सुरेश कदम, माहिर मठकर, संतोष टक्के, अजय गुरसाळे यांनी मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ तिरपणकर यांनी केले.सूत्रसंचालन भरत तोरसकर यांनी करून श्रुती उरुणकर यांनी आभार मानले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी गंधाली तिरपणकर, श्रुती उरुणकर, दत्ता कडुलकर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचा शेवट सहदेव धरणे यांनी घातलेल्या मालवणी गाऱ्हाण्याने झाली.







