“समर्थ म्युझिक क्लासेस”…..

भारतीय संस्कृतीमध्ये संगीताला खुप मोठी प्राचीन परंपरा आहे. संगीत ही अतिप्राचीन कला आहे. गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही कलांना मिळून संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे आणि शिकलेही पाहिजे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. हे काही सांगायला नको. संगीत ऐकणं आणि ऐकवणं या दोन्हींमध्ये एक वेगळीच मजा आहे. म्युझिक मनाला शांत ठेवते, चांगले संस्कार घडवते आणि मुलांना मोबाईल आणि ईतर वाईट गोष्टींपासून दूर ठेवते. संगीत ऐकणं तर खूपच सोपं आहे. पण सांगीत शिकण्यासाठी एक योग्य प्लॅटफॉर्म सोबतच मार्गदर्शनाची गरज असते. आता हे सहज शक्य आहे ते समर्थ म्युझिक क्लासेसच्या सोबतीने.

संगीत शिकणाऱ्यांसाठी आणि शिकवणाऱ्यांसाठी अतिशय उत्तम असा प्लॅटफॉर्म “समर्थ म्युझिक क्लासेस” डोंबिवली पूर्व येथे उपलब्ध करून दिला आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आपापल्या आवडी प्रमाणे कोणतेही वाद्य तिथे जाऊन शिकू शकतात.

अनुभवी शिक्षक तसेच अत्यंत माफक फी मध्ये सर्व क्लासेस उपलब्ध आहेत.

तबला, पेटी आणि पखवाज सोबतच गिटार, पियानो आणि बासुरी इत्यादी वाद्य तिथे शिकवली जातात.

त्याच प्रमाणे शास्त्रीय गायन आणि संगीत भजन चे क्लासेस सुद्धा उपलब्ध आहे. आजच संपर्क करा:- समर्थ म्युझिक क्लासेस शॉप नंबर १४, ओंकार हाईट्स, शनी मंदिर शेजारी, न्यू गार्डियन स्कूल समोर, डोंबिवली पूर्व –

सुशांत गावडे :-8975547073 / 9763652816