Home स्टोरी समता परिषद मुंबई सेवा प्रकल्पचे मुंबई शिवाजी पार्क येथे उद्घाटन.

समता परिषद मुंबई सेवा प्रकल्पचे मुंबई शिवाजी पार्क येथे उद्घाटन.

54

मसुरे प्रतिनिधी: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही समता परिषद मुंबईतर्फे सेवा प्रकल्पाचे ४ डिसेंबर सायंकाळी ०५.०० वाजता शिवाजी पार्क येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

चैत्यभूमी, दादर चौपाटी येथे देशभरातून व विदेशातून लाखो अनुयायी व बौद्ध भिक्खू प.पू. डॉ बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन करण्यासाठी येतात. गेली ४१ वर्षे समता परिषद मुंबईतर्फे या अनुयायांना व बौद्ध भिक्खूंना चपाती–भाजी, पुलाव भात, चहा–बिस्किटे अशा विविध अन्नसेवा सातत्याने पुरवली जाते.

समता परिषद मुंबई अध्यक्ष व माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ४१ वर्ष हा सेवा प्रकल्प यशस्वीपणे राबविला जात आहे. या सेवा प्रकल्पाचे उद्घाटन मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटमजी, महाराष्ट्राचे मंत्री मा. ना. आशिष शेलारजी, मा. ना. प्रवीण दरेकरजी, रा. स्व. संघ मुंबई कार्यवाह विलासजी भागवत, पत्रकार श्री. किरण शेलार ,भाजप प्रवक्ते नवनाथ बन, भाजप महामंत्री राजेश शिरवाडकर, सम्राट चे संपादक कुणाल कांबळे .

समता परिषद मुंबई चे कार्याध्यक्ष अशोक कांबळे, शरद कांबळे, मयूर देवळेकर,योजना ठोकळे, समिता कांबळे, ज्योती श्रेष्ठी, जयश्री खरात, रवींद्र लाखन, विजय भाऊ पवार ,गुलाब कांबळे, उदय पडेलकर, संजय अढंगळे, सुभाष कांबळे, संजय साळवे, विनोद कांबळे, सिद्धार्थ सकपाळ, सुभाष धोत्रे, दिनकर पवार , प्राध्यापक पवार आणि शेकडो समता परिषद मुंबईचे महिला व पुरुष कार्यकर्ते अविरत सेवा देत आहेत.