Home स्टोरी ‘सत्ताधारी पक्ष अशा घटनांना प्रोत्‍साहित करतो!’शरद पवार यांचे धर्मांधांना पाठीशी घालणारे विधान….

‘सत्ताधारी पक्ष अशा घटनांना प्रोत्‍साहित करतो!’शरद पवार यांचे धर्मांधांना पाठीशी घालणारे विधान….

136

८ जून वार्ता: कुणीतरी भ्रमणभाषवर काहीतरी संदेश पाठवला. तो चुकीचा असेल; पण त्‍यासाठी रस्‍त्‍यावर उतरून त्‍याला धार्मिक स्‍वरूप देणे, हे योग्‍य नाही. सत्ताधारी पक्ष या घटनांना प्रोत्‍साहित करतो, अशी टीका शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्‍या सरकारवर केली. ते पुढे म्‍हणाले की, राज्‍य सरकारचे दायित्‍व राज्‍यात शांतता प्रस्‍थापित करण्‍याचे असते; मात्र शासनकर्तेच रस्‍त्‍यावर उतरायला लागले असून त्‍यातून २ समाजांत जातीय आणि धार्मिक कटुता निर्माण व्‍हायला लागली, तर ते चांगले लक्षण नाही.हे सगळे घडवले जात आहे. औरंगजेबाचे चित्र दाखवले, तर त्‍यासाठी पुण्‍यात दंगल आणि आंदोलन करण्‍याचे काय कारण आहे ?