मसूरे प्रतिनिधी: नवी दिशा,नवे उपक्रम या राज्यस्तरीय शैक्षणिक समूहाच्या वतीने अहिल्यानगर येथे नवी दिशा नवे उपक्रम भाग – ३ पुस्तक प्रकाशन सोहळा, व महाराष्ट्रातील गुणवंत शिक्षकांना राज्य स्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025 वितरण सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला .
गेल्या आठ वर्षांपासून नवी दिशा,नवे उपक्रम समूह सातत्याने सुरू असून महाराष्ट्रातील शिक्षकांना उपक्रम दिशा देण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे.शिक्षक, विद्यार्थी, शाळा यांना या समूहाचा फायदा होत आहे.समूहाच्या माध्यमातून,समूह सदस्यांच्या सहभागातून,देणगी दाते यांनी दिलेल्या मदतीने दरवर्षी नवनवीन सामाजिक, शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात.
यावर्षी महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांना एकत्रितकरून त्यांनी प्रत्यक्ष वर्गात राबविलेल्या उपक्रमांचे पुस्तक प्रकाशन तसेच त्यांनी केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची समूहातर्फे दखल घेऊन राज्य स्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार सावेडी अहिल्यानगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. मुळ देवगड तालुक्यातील मुणगे गावचे रहिवासी असलेल्या व रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. पू. प्रा. आदर्श केंद्र शाळा चिखली नं.1 तालुका गुहागर शाळेचे शिक्षक सतिश पांडुरंग मुणगेकर यांना प्रसिद्ध रानवेडी कवितेचे कवी श्री. तुकाराम धांडे, मिठाचा शोध या पाठाच्या प्रसिद्ध लेखिका अंजलीताई अत्रे यांच्या हस्ते राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. सतीश मुणगेकर हे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य चे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. आविष्कार फाऊंडेशन इंडियाचा गुहागर तालुकाध्यक्ष असून स्वतःची व शाळेची ब्लॉग वेबसाईट तयार केलेली आहे. ३५ आॕफलाईन शैक्षणिक ॲपची निर्मिती.जिल्ह्यातील एकमेव शिक्षक आहेत. शाळेचे सर्व शालेय अभिलेखे (रेकॉर्ड ) डिजिटल स्कूल सॉप्टवेअर मध्ये असणारी रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. शैक्षणिक ई – साहित्याची निर्मिती FLIPBOOK ई – साहित्याची निर्मिती, WAKALET ई – साहित्याची निर्मिती. INTERACTIVE CONTENT ची निर्मिती, SMART PDF ची निर्मिती, VIRTUAL CLASSROOM चा वापर, 3D, 4D तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, आभासी प्रयोगशाळेचा अध्यापनात वापर असे विविध उपक्रम ते राबवतात. त्याचे स्वतःचे SWARALI CREATION हे यु ट्युब चॕनेल आहे.यावर शैक्षणिक अॕनिमेटेड व्हिडिओ, क्राप्ट व्हिडिओ तसेच इतर शैक्षणिक व्हिडिओ आहेत.विद्यार्थी व शिक्षक यांचे ओळखपत्र Q R CODE मध्ये तयार केलेले आहेत.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक शिक्षक या विभागात सलग विजयाची परंपरा त्यानी राखली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अॉनलाईन शिक्षक स्पर्धेत PPT सादरीकरणात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक. राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी च्या IT CELL या विभागात सहभाग आहे.
गुहागर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये तसेच काही गावांमध्ये गुलमोहर, चिंच, बेहडा, इ.५०० रोपांचे मोफत वाटप त्यांनी केले आहे. शैक्षणिक गट संमेलन, विज्ञान प्रदर्शन तसेच केंद्र , बीट व तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेत चंदनाची व काळीमिरीची रोपे यांचे मोफत वाटप तसेच विविध कार्यक्रमात तुळशीच्या रोपांचे मोफत वाटप केले आहे. श्री सतिश मुणगेकर यांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्वल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सोहळा संपन्न करण्यासाठी . प्रकल्प प्रमुख , श्री.बळीराम जाधव, संगीता म्हस्के व सर्व संपादक मंडळी यांनी मेहनत घेतली. सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून प्रसिद्ध रानवेडी कवितेचे कवी श्री. तुकाराम धांडे, मिठाचा शोध या पाठाच्या प्रसिद्ध लेखिका अंजलीताई अत्रे,नि.व.सा.पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष श्री. प्रमोद दादा मोरे, संपादक /समुहाचे संस्थापक श्री. देवराव चव्हाण, विजया महाडिक मॅडम आदि उपस्थित होते.