Home स्टोरी सगळे एकत्र आलो हेच सावंतवाडीतले “रामराज्य”…!

सगळे एकत्र आलो हेच सावंतवाडीतले “रामराज्य”…!

122

सर्वपक्षियांची “फटकेबाजी”; ओंकार कलामंचच्या जल्लोषला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

 

सावंतवाडी,ता.२३: “जल्लोष रामलल्लाचा” या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी असे सर्व पक्षाचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर आले. यात तीन माजी नगराध्यक्षासह माजी नगसेवक आणि माजी आमदार राजन तेली यांचा समावेश होता. यावेळी सर्वांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. यावेळी रामाच्या नावाने सर्व एकत्र आलो म्हणजे रामराज्य आले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सावंतवाडीची ही एकत्र येण्याची संस्कृती अशीच कायम राहो, अशा उपस्थितांकडुन शुभेच्छा देण्यात आल्या. ओंकार कलामंचाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष रामलल्लाचा” या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार राजन तेली यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, संजू परब यांच्यासह माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, गुरू मठकर, सुधीर आडिवरेकर, उमाकांत वारंग, माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे, अ‍ॅड. अनिल निरवडेकर, युवक राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नईम मेमन, अभिनव अकॅडमीचे विलास पोळ, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतिश बागवे, रवी जाधव, सुरेश भोगटे, दिलीप भालेकर, महेश नार्वेकर, विनायक कोंडल्याळ, अरविंद पोकार, मुकेश पटेल, दीपक सावंत, अरुण भिसे, केतन आजगावकर, अजय सावंत, बंटी पुरोहित, आशिष सुभेदार यांच्यासह ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर, अनिकेत आसोलकर, सचिन मोरजकर, आनंद काष्टे, हेमंत पांगम, सिद्धेश सावंत, भुवन नाईक, नितेश देसाई, मृणाल पावसकर, चैतन्य सावंत, रोहित गावडे, ओम टेंबकर, धैर्य कोळमेकर, प्रशांत मोरजकर, सौ. आर्या टेंबकर, नारायण पेंडुरकर, दीपेश शिंदे, रोहित पाळणे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. तेली यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, राम मंदिर उभे रहावे यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. त्यासाठी आम्ही जेल मध्ये गेलो. मात्र आता केलेल्या कामाचे समाधान झाले असे वाटते. याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेद्र मोदी यांना द्यावेसे वाटते. या ठिकाणी ओंकार कलामंचाने सर्व पक्षीयांना एकत्र आणून एक अनोखी किमया साधली आहे. याचाच अर्थ यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वेशभुषा आणि रिल्स स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी अनेक कलाकारांनी यात सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे सुत्रसंचालक सचिन सावंत आणि सचिन पाटकर यांनी केले.