सावंतवाडी प्रतिनिधी: ओवळी येथील माजी उपसरपंच लवु सावंत खून प्रकरणात त्याचा सख्खा भाऊ अजित सावंत याला पोलिसांनी अटक केली आहे. अजित सावंत याला आज सावंतवाडीतील न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सख्ख्या भावाकडून भावाचा खून करण्यात आल्याची ही जवळपास हि चौथी घटना आहे. शेतमांगरात लवु सावंत हे रात्री झोपण्यासाठी गेले होते. सोमवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत सक्का भाऊ अजित सावंत याने त्याचा खून केला असे प्रथम दर्शनी पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. श्वान पथक तपासणीत संशयित आरोपी सक्का भाऊ अजित सावंत यांच्या आजूबाजूलाच घोटमळत होता, त्यावरून पोलिसांनी अजित सावंत याला काल सायंकाळी ताब्यात घेतले होते. रात्री त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे. सख्या भावानेच आपल्या भावाचा खून केला आहे. हा खून कोणत्या कारणासाठी केला? याचा तपास पोलीस करत आहेत. अजून या खून प्रकरणात कुणाचा हात आहे का? याचा तपास पोलीस करणार आहेत. सावंतवाडी न्यायालयासमोर सरकारी वकील वेदिका राऊळ यांनी युक्तिवाद केला.