मालवण प्रतिनिधी: धनगर समाजाचा बुलंद आवाज महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती..
जिल्हा दौरा प्रमुख नवलराज विजयसिंह काळे यांचे जास्तीत जास्त उपस्थितीचे सकल धनगर समाजाला उपस्थित राहण्याचे आवाहन…
मालवण प्रतिनिधी:
बहुजनांचे कैवारी धनगर समाजाचा बुलंद आवाज महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी ओरोस येथील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या हॉलमध्ये सकाळी 1१ वाजता *धनगर जागर यात्रा* बैठक आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रम संदर्भात आयोजित नियोजन बैठकीला नवलराज काळे, शांताराम उर्फ बाळा गोसावी, संतोष साळसकर, अमोल जंगले, सुरेश झोरे, मयूर चव्हाण,राजेश जानकर,सुशील खरात,रामचंद्र मसूरकर,प्रथमेश निकम,गुरुनाथ बबनआळे, व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नवलराज काळे यांनी बैठकीबाबतचे नियोजन कसे असेल याबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना कार्यक्रम स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यास आवाहन केले.
धनगर जागर यात्रा या बैठकीत ना कोणत्या पक्षाचा बॅनर, ना कोणत्या पक्षाचा झेंडा,ना कोणत्या संघटनेचा बॅनर फक्त सकल धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती मधील समाज बंधू भगिनींच्या उपस्थितीत ही धनगर जागर यात्रा संपन्न होणार आहे असून महाराष्ट्र राज्यातील बहुजनांमधील विधान परिषद सभागृहातील धनगर समाजाचा बुलंद आवाज आमदार पडळकर साहेब हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. सदर दौरा हा राजकीय नसून सामाजिक दौरा आहे याची सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी. या बैठकीत कुठेही कोणत्याही पक्षाचा झेंडा वापरला जाणार नाही किंवा उपस्थित असणाऱ्या समाजाला कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधले जाणार नाही याची खात्री आणि हमी नवलराज काळे यांनी समाज बंधू-भगिनींना दिली आहे.
समाज जागृत करणं आमचं काम आहे समाजाला उन्नतीकडे नेण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करूच तुम्ही कुठल्या पक्षाचे काम करायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे परंतु आपल्या समाजातील महाराष्ट्र राज्यातील समाजासाठी धडपडणारा आपला हक्काचा आमदार आपल्या जिल्ह्यात येत आहे त्यांचे मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत करणे धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती मधील समाज म्हणून आपलं सर्वात प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका न बाळगता आपण समाज बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नवलराज काळे यांनी समाज बंधू-भगिनी यांना केले आहे.सदर बैठकी दरम्यान समाज संघटना, समाज बंधू-भगिनींना व गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हितचिंतकांना विकास कामांबाबत काही निवेदने द्यावयाचे असल्यास लेखी स्वरूपात असलेले निवेदन आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे सुपूर्त करून त्यांचे स्वीय सहायक आबासाहेब कोकरे यांच्याकडून पोच घ्यावी. अशी माहिती नवलराज काळे यांनी दिली आहे.