मुणगे येथे श्री भगवती देवस्थान कडून गुणवंतांचा सन्मान!
मसुरे प्रतिनिधी:
दुसऱ्यांच्या अभिनंदनासाठी टाळ्या वाजविण्या पेक्षा तुमच्या साठी साठी इतर टाळ्या वाजवतील असे काम करा. संस्कार, संस्कृती, शिक्षण या त्रिसूत्री विध्यार्थी दशेत आत्मसात करा. चांगले संस्कार घरातून मिळवा. तंत्रज्ञाना बरोबरच आपली संस्कृती जपा. अल्प यशात समाधान न मानता ध्येय निश्चित ठेवून यशाचा पाठलाग करा असे प्रतिपादन श्री भगवती एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापक देवदत्त उर्फ आबा पुजारे यांनी येथे केले.
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवस्थानच्या वतीने गावातील पहिली ते बारावी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव कार्यक्रम श्री भगवती देवालय येथे झाला त्या प्रसंगी ते बोलत होते.
मागील अठरा वर्ष श्री भगवती देवस्थानच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम चालू आहे. यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ साक्षी गुरव, देवस्थान अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निशाद परुळेकर,पोलीस पाटील सौ साक्षी गोविंद सावंत, श्री भगवती हायस्कुल शिक्षिका सौ गौरी तवटे, श्री राणे, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.
आजचे विध्यार्थी भाग्यवान आहेत ज्यांचा सन्मान सर्वांच्या श्रध्दास्थानी असलेल्या आई भगवती देवालयात झाला आहे. मोठे झाल्यावर गावचे नाव रोशन करा असे आवाहन मुणगे सरपंच सौ साक्षी गुरव यांनी केले. सौ गौरी तवटे, प्राथमिक शिक्षक श्री राणे यांनी मार्गदर्शन केले. सचिव निषाद परुळेकर यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी रामतीर्थ कारेकर, विश्वस्थ अनिल धुवाळी, रामचंद्र मुणगेकर, पुरुषोत्तम तेली, आनंद घाडी,गणेश खरात, नाना बागवे, माजी सरपंच सुरेश बोरकर, संतोष लब्दे,दिगंबर पेडणेकर, विश्वास मुणगेकर, सचिन तवटे, नंदकुमार सोनटक्के, विशाल खडसे, संतोष राठोड, सुरबा सावंत, अरविंद सावंत, संजय पुजारे, उमेश पाडावे, प्रमोद सावंत, कृष्णकांत गुरव, गणपत दळवी, आपा घाडी, श्री आईर आदी उपस्थित होते. यावेळी एक ते तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके देवस्थान ट्रस्ट च्या वतीने देण्यात आली. सुत्रसंचलन व आभार देवदत्त पुजारे यांनी मानले.