Home स्टोरी संसारासहित उध्वस्त झालेल्या झोपडीचा अखेर चार दिवसानंतर पंचनामा! सामाजिक बांधिलकीचा पुढाकार

संसारासहित उध्वस्त झालेल्या झोपडीचा अखेर चार दिवसानंतर पंचनामा! सामाजिक बांधिलकीचा पुढाकार

112

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: रमेश सुभाष जाधव राहणार बाहेरचा वाडा सावंतवाडी सदर व्यक्ती विजापूर येथून 2004 सावंतवाडी शहरांमध्ये रोजगारासाठी आला होता. मोल मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. दोन मुले पत्नी असा त्याचा परिवार आहे. सदर व्यक्ती बाबू राजगुरू यांच्या मालकीच्या जागेमध्ये झोपडी बांधून राहत होता व पैसे गोळा करून सदर व्यक्तीने आपला संसार उभा केला होता. चार दिवसापूर्वी सदर व्यक्ती काही कामानिमित्त आपल्या परिवारासोबत गावी गेला असता अन्यात व्यक्तीने त्यांच्या झोपडीला आग लावून त्यांचा संसार उध्वस्त केला. सदर व्यक्ती बाहेर गावचा असल्याकारणाने सहसा त्याच्याकडे कोणी लक्ष दिला नाही. सदर व्यक्तीने अखेर शेवटी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्याकडे हीच बाब मांडली असता सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सदर घटनेची माहिती देऊन पंचनामा करण्यासाठी विनंती केली असता सदर घटनेच्या स्थळी पोलीस येऊन आज पंचनामा केला व दोषावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं त्यांनी आश्वासन दिले.असता उध्वस्त झालेल्या कुटुंबाला एक आशच किरण मिळाले त्यांनी सामाजिक बांधिलकीचे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे भावनावश होऊन आभार मानले. सदर घटनास्थळी सावंतवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंते यांनी घटनेची पाहणी करून हा पंचनामा केला.