Home स्टोरी संदीप कदम यांची उबाठा सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी निवड…!

संदीप कदम यांची उबाठा सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी निवड…!

260

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा उबाठा शिवसेना पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी समाजभूषण पुरस्कार प्राप्त संदीप लहु कदम यांची निवड करण्यात आली आहे. संदीप कदम हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु , फुले, आंबेडकर चळवळीतील लोक संपर्क असलेले नेते आहेत . एकेकाळी मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार डॉ . भालचंद्र मुणगेकर यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून त्यांची राजकीय ओळख आहे .

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणुन ते काम करत आहेत .माध्यमिक पतपेढीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक आहेत . तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ते जिल्हाध्यक्ष असुन कर्मचारी संघटनेचे नेते म्हणुन ते परिचित आहेत . कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक मोर्चे आंदोलने निदर्शने करण्यात ते नेहमी आघाडीवर असतात . सामाजिक ,सांस्कृतिक ,क्रिडा , सहकार क्षेत्रात त्यांचे बहुमुल्य योगदान असल्याने समाजसेवेचा राज्य स्तरीय समाजभुषण पुरस्कार त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राप्त झालेला आहे . त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेवुन त्यांना आज उध्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपजिल्हा प्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली .सदरवेळी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर , आमदार वैभव नाईक ,जिल्हाप्रमुख संदेश पारकर , उपनेते गौरीशंकर खोत ,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत , युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , माजी नगरसेवक कन्हैया पारकर आदि उपस्थित होते .