शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन_
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्ना नंतर घृणास्पत कृती करून शिंदे गटाच्या नेत्यांना अपमानीत केले आहे संजय राऊत यांच्या या कृतीचा जाहिर निषेध करण्यासाठी कल्याण पूर्व शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जोडो मारो आंदोलन करून संजय राऊत याच्या कृतीचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान संजय राऊत यांना पत्रकाराने खासदार ड़ॉ. श्रीकांत शिंदें यांचे बाबत एक प्रश्न विचारला, या वेळी संजय राऊत यांनी थू म्हणत थुंकण्याची कृती करत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना अपमानीत केले. त्यांच्या या घृणास्पद कृती विरोधात राज्यभरात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेकडून संजय राऊत यांच्याविरोधात राज्यभरात जोडे मारो आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून कल्याण पूर्व शिवसेनेच्या वतीने पूणे लिंक रोड, गुंजाई चौकात संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक रावणाचे तोंड असलेल्या पुतळ्याला जोडे मारुन आंदोलन करण्यात येऊन संजय राऊत याच्या कृतीचा जाहिर निषेध करण्यात आला.
या समयी प्रसार माध्यमांशी बोलतांना महेश गायकवाड यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे लोकांच्या जनहिताची कामे तिव्र गतीने करीत आहेत, त्या मुळे संजय राऊत याचे संतुलन बिघडत चालले आहे भविष्यात संजय राऊतने कोणत्याही प्रकारचे आमच्या नेत्यां बद्दल आक्षेपहार्य विधान केले तर ते जातील तिथे त्यांचा निषेध केला जाईल. या आंदोलनात शहर प्रमुख महेश गायकवाड यांचे सह महिला आघाडीच्या सौ. पुष्पाताई ठाकरे, माजी नगरसेवक कैलास शिंदे, श्री. युवासेना उप जिल्हाधिकारी भूषण यशवंतराव,युवासेना शहर अधिकारी श्री. रोहित डुमणे, शाखा प्रमुख प्रशांत बोटे,सचिन आळंगे, उपविभागप्रमुख शंकर पाटील, तेजस देवकाते, रोशन पांडे तसेच शिवदास गायकवाड, श्री. प्रशांत अमीन, कृष्णा पाटील, निलेश रसाळ, रवी खांदोडे,सौ. वैशाली ठाकूर, सौ . मीना मुठे, सौ. सनम शेख आदी पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.