१२ मे वार्ता: राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. संजय राऊत यांनी फडणवीसांची डिग्री तपासायला पाहिजे, असे विधान केले होते. या विधानाला भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. फडणवीसांची डिग्री तपासण्यापेक्षा संजय राऊत पत्रकार आहेत का? हे पहिलं तपासलं पाहिजे. असं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले.
मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उद्धव ठाकरे यांची गुरुवारी मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे नितिमत्ता आणि नैतिकतेची भाषा करतात, पण ते स्वत:चा आत्मा, स्वत:चा धर्म विकून महाराष्ट्राशी आणि हिंदुत्वाशी बेईमानी करत आहेत. लालु प्रसाद यांनी राम मंदिरारासाठी निघालेल्या रथ यात्रेला विरोध केला, रथ अडवला. त्यांच्याबद्दल हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामनामध्ये असंख्य अग्रलेख लिहिले आहेत. ते अग्रलेख संजय राऊत यांनी वाचून दाखवावे. नितिमत्ता आणि नैतिकतेची भाषा सांगण्यापेक्षा आधी आमदारकी सोडून दाखवा मग मुख्यमंत्री पदाची चर्चा करा, असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.