Home स्टोरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून नवरात्रीमध्ये घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दुर्गामाता दौडचे आयोजन !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून नवरात्रीमध्ये घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दुर्गामाता दौडचे आयोजन !

119

१७ ऑक्टोबर वार्ता: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी वर्ष १९८२ पासून सांगली येथून दुर्गामाता दौड उपक्रमाचा आरंभ केला. जनमानसात हिंदु धर्म, संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार, तसेच नवरात्रीनिमित्त सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर करण्याच्या उद्देशाने ३० दशकांहून अधिक काळापासून राज्यभर हा उपक्रम राबवला जात आहे. गावोगावी देव, देश आणि धर्म यांविषयी जागृती करण्यासाठी तरुण-तरुणी एकत्र येतात अन् छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्फुलिंग जागवण्यासाठी दुर्गामाता दौडीचे आयोजन करत आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि बजरंग दल दुर्गा वाहिनीच्या वतीने आदिमाया आदिशक्तीचा जागर करण्यात येत असतो. प्रतिदिन सकाळी ६ वाजता प्रत्येक ठिकाणी धारकरी एकत्र येऊन एका मंदिरापासून दुसर्‍या मंदिरापर्यंत हातात भगवे ध्वज आणि डोक्यावर भगवी टोपी परिधान करून श्री दुर्गादेवी, भारतमाता आणि वीर पुरुष यांचा जयजयकार करतात. यामुळे प्रत्येकात राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे, या उदात्त हेतूने ही दुर्गादौड काढली जाते.