Home Uncategorized श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम

158

मसुरे प्रतिनिधी:                                              मालवण तालुक्यातील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम कऱण्यात आला. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या आदेशानुसार व माननीय आयुक्त ग्रंथालय संचनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई आणि माननीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी सिंधुदुर्ग ओरोस यांच्या आवाहनानुसार जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले होते.यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री उदय परब, कार्यवाह श्री प्रवीण पारकर, उपाध्यक्ष श्री. दादा परुळेकर, खजिनदार श्री .गजानन सुर्वे, कांदळगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री सागर देसाई , ग्रंथपाल सौ साक्षी मेस्त्री,कर्मचारी श्री महेश साळकर, श्री आशिष आचरेकर तसेच इतर वाचक आणि मुले उपस्थित होते.यावेळी बालवाचकांच्या हस्ते सुद्धा वृक्षारोपण करण्यात आले.