Home शिक्षण श्री भगवती हायस्कुल मुणगेच्या देवांग मेस्त्रीची कलाकृती राज्यात प्रथम!

श्री भगवती हायस्कुल मुणगेच्या देवांग मेस्त्रीची कलाकृती राज्यात प्रथम!

138

राष्ट्रीय स्पर्धेत करणार राज्याचे नेतृत्व….!

मसुरे प्रतिनिधी:

 

पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कला उत्सव २०२३ स्पर्धेत स्थानिक खेळणी बनवणे कला प्रकारात (मुलांमध्ये) देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलचा नववीतील विध्यार्थी कु. देवांग रघुनाथ मेस्त्री याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.  त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.देवांग याला कलाशिक्षिका सौ गौरी तवटे यांचे मार्गदर्शन लाभले.

शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली आणि एनसीईआरटी,नवी दिल्ली व महाराष्ट्र प्रथमिक शिक्षण परिषद, मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे यांच्या संयुक्त विध्यमाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणेच्या महात्मा फुले सभागृह येथे उपसंचालक डॉ नेहा बेलसरे यांच्या हस्ते देवांग मेस्त्री याला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. देवांग याने कसाल येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत मुलांमधून प्रथम क्रमांक पटकावला होता. पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत करवंटी पासून विविध कलाकृती बनवत त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष न. ना. पंतवालावलकर उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, व्यवस्थापक आबा पुजारे,  माजी मुख्याध्यापक संजय बांबूळकर, मुख्याध्यापिका श्रीमती एम बी कुंज यांनी संस्था व प्रशालेच्या वतीने अभिनंदन केले आहे.