Home स्पोर्ट श्री भगवती हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत यश!

श्री भगवती हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत यश!

183

मसूरे प्रतिनिधी: देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल च्या दोन विध्यार्थ्यानी जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. कोल्हापूर येथील विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. मेघेश आनंद वळंजु (३५ किलो वजनी गट) याने प्रथम क्रमांक तर भूषण संतोष खरात (५५ किलो वजनी गट) याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या विध्यार्थ्यांना शिक्षक एन. जी. वीरकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन होत आहे.