मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती एज्युकेशन सोसायटी संचलित श्री भगवती हायस्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.एकूण ३५ विध्यार्थी प्रविष्ठ झाले होते.



प्रथम क्रमांक सई संदीप राणे. (95.40%), द्वितीय ईशा विजय प्रभू (88.80%), तृतीय यश विनोद सावंत (88.20%) यांनी यश प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष न. ना. पंतवालावलकर,उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, व्यवस्थापक देवदत्त पुजारे यांनी अभिनंदन केले आहे.







