Home स्टोरी श्री देव बांदेकार ग्रामविकास मंडळ वेर्ले तर्फे किक बाॅक्सिग खेळाडू कु....

श्री देव बांदेकार ग्रामविकास मंडळ वेर्ले तर्फे किक बाॅक्सिग खेळाडू कु. श्रीकृष्ण लिंगवत याचा गौरव…!

400

सावंतवाडी प्रतिनिधी: वेर्ले गावचे सुपुत्र कु. श्रीकृष्ण राजन लिंगवत याने किक बाॅक्सिग खेळा अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून किक बाॅक्सिगचे प्रतिनिधित्व करणार आहे. दि. ०७ फेब्रुवारी २०२४ पासून नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय किक बाॅक्सिग स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत १८ देशाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये श्रीकृष्ण भारताच्या सिनिअर संघाकडून खेळणार आहे.

श्रीकृष्णाच्या या उत्तुंग यशाबद्दल गौरव करण्यासाठी तसेच पुढे होणाऱ्या सर्व स्पर्धेमध्ये असेच यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी श्री देव बादेकार ग्रामविकास मंडळ वेर्ले तर्फे श्रीकृष्णचा सत्कार व शुभेच्छा सोहळा आयोजित करण्यात आला. अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत कठीण परिस्थितीतून हे यश श्रीकृष्ण याने साध्य केल्याने सर्वांनीच त्याचं कौतुक केले.या

प्रसंगी श्री देव बांदेकार ग्रामविकास मंडळाचे मार्गदर्शक श्री. गोविंद लिंगवत, श्री. लाडजी राऊळ, श्री. चंद्रकांत राऊळ, श्री. विष्णुदास लिंगवत गावचे पोलिस पाटील श्री. अरुण लिंगवत, श्री देव बादेकार ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री. जानदेव लिंगवत, पदाधिकारी व कार्यकर्ते श्री. प्रसाद गावडे, श्री. संदेश गोसावी, श्री. सुनिल राऊळ, श्री. मधुकर लिंगवत, श्री. अनिल गावडे, श्री. सुरेश गावडे, श्री. महादेव लिंगवत, श्री. अशोक गोसावी, श्री. उदय मेस्त्री, श्री. विजय गोसावी, श्री. चिन्मय जडये, श्री. प्रसाद विजय राऊळ, श्री. शरद राऊळ, श्री. प्रकाश मर्गज, श्री . प्रशांत घोगळे आदि उपस्थित होते.