सावंतवाडी प्रतिनिधी: कारिवडे येथील श्री देवी कालिका मंदिर कारिवेडे येथे गुढीपाडव्याच्या (हिंदू नवं वर्षाच्या सोहळ्यानिमित्त) मंगळवार दि. ९ एप्रिल दिवशी सायंकाळी १० वाजता, श्री अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ, निरवडेयांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. याचा सर्व नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री देवी कालिका देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने अध्यक्ष श्री. बाबाजी बाबू गावकर,खजिनदार श्री. बोंबडे बाळकृष्ण गांवकर, सचिव श्री. दत्ताराम विष्णू गावडे, यांच्या कडून करण्यात आले आहे.