Home स्टोरी श्री तुळजाभवानीदेवीच्‍या गहाळ अलंकारांविषयी चौकशी व्‍हावी!

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या गहाळ अलंकारांविषयी चौकशी व्‍हावी!

141

छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आंदोलनाची चेतावणी!

२६ जुलै वार्ता: भाविक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री तुळजाभवानीमातेला अर्पण केलेल्‍या सोन्‍या-चांदीच्‍या वस्‍तूंची मोजणी पूर्ण होऊन ३ सप्‍ताह झाले आहेत. यामध्‍ये काही अलंकार गहाळ झाल्‍याविषयी चौकशी व्‍हावी, अशी मागणी कोल्‍हापूर छत्रपती घराण्‍याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी श्री तुळजाभवानी देवस्‍थानचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे पत्राद्वारे केली आहे.या पत्रात म्‍हटले आहे की, सखोल चौकशी करून त्‍याविषयीचा सविस्‍तर अहवाल सार्वत्रिक करावा. अन्‍यथा या अपप्रकाराविषयी स्‍वराज्‍य पक्षाच्‍या वतीने मोठे जनआंदोलन उभे करण्‍यात येईल. यापुढे श्री भवानीदेवीच्‍या अलंकारांची मोजणी ‘ऑन कॅमेरा’ करावी.