Home शिक्षण श्री गोपाळ गवस अखिल भारतीय बार कौन्सिलद्वारे आयोजित परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण

श्री गोपाळ गवस अखिल भारतीय बार कौन्सिलद्वारे आयोजित परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण

43

दोडामार्ग प्रतिनिधी: दोडामार्ग तालुक्यातील श्री गोपाळ गवस यांनी मुंबई युनिव्हर्सिटी विधीशास्त्रातील पदवी शिक्षण पूर्ण करून अखिल भारतीय बार कौन्सिलद्वारे आयोजित परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करत आपल्या जिद्दीचे आणि चिकाटीचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. अनेक  आव्हाने आणि जबाबदाऱ्या पेलत त्यांनी मिळवलेले हे यश केवळ वैयक्तिक नसून सर्व मित्र परिवार व कुटुंबाचे आहे. तसेच असंख्य स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी आशेचा किरण आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घवघवीत यशामुळे समाजातील प्रत्येक स्तरातून अभिमानाने आणि आपुलकीने त्यांचे कौतुक होत आहे. यापूर्वी त्यांनी M.A. हिंदी, M.A. समाजशास्त्र आणि B.Ed. इंग्रजीमाद्यमातून पदवीधर होऊन कळसुळाकर हायस्कूल सावंतवाडी येथे प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. तसेच N. C. C. फर्स्ट ऑफिसर या पदावर कार्यरत असून आजवर अनेक विध्यार्थ्यांना N. C. C. चे प्रशिक्षण उत्तमरित्या देत N. C. C. चे सक्षम विध्यार्थी घडवले आहेत.

हे सुरु काही सुरु असतांनाच विविध काम करण्याची आवड असल्यामुळेच दिव्यांग यांच्यासाठी सामाजिक कार्यात सहभागी होणे, श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी काम पाहणे, अंशकालीन सेनाधिकारी भारतीय थल सेना, सहाय्यक शिक्षक माध्यमिक विभाग, श्री गणेश गृह निर्माण संस्था सचिव म्हणून कार्यरत असून उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. तसेच उच्चशिक्षित असूनही वेगवेगळ्या कार्यक्षेत्राची आवड असल्याने त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटी विधीशास्त्रातील पदवी शिक्षण पूर्ण करून कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण करत शिक्षणासाठी वय, परिस्थिती किंवा अडथळे कधीच कारणीभूत ठरत नाहीत. हे त्यांनी आपल्या संघर्षातून आणि या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे साहजिकच श्री गोपाळ. गवस यांचा हा जीवन प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.