सिंधुदुर्ग प्रतिनिधी: हिंदू जननायक मान.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या शुभाशीर्वादाने,म.न.से. नेते मान. श्री.शिरीष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. विमोलजी मयेकर यांच्या माध्यमातून आणि श्री.संतोष मयेकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री.अमितसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज श्री.पुंडलिक अंबाजी कर्लै कला आणि वाणिज्य महाविद्यालय, शिरगांव येथे ग्रथालयाला विविध संदर्भातील पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली. या वेळीं महाविद्यालयाचे चेअरमन श्री.संभाजीराव साटम, प्राचार्य श्री. ध्वजेंद्र मिराशी, प्राध्यापिका सौ.सिद्धि कदम यांनी भेटीचा स्विकार करुन मान.अमितसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्याच्या अनेकोत्तम शुभेच्छा देऊन आभार मानले व भविष्यात म.न.से तर्फे आयोजित उपक्रमांमांना सहकार्य असेल अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी देवगड म.न.सेचे श्री.संतोष मयेकर,श्री.निलेश ईंदप (शाखाध्यक्षलालबाग-परळ), सौ.प्रांजल राणे (महिला उपविभाग अध्यक्ष अणुशक्ती नगर), श्री.अनंत आचरेकर , दत्ताराम अमृते , सौ.अर्पिता राघव, श्री.बबलु परब,श्री.राजन पवार, श्री. किशोर ठुकरूल, सौ. सुहासिनी प्रभ, इत्यादी म.न.से कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी प्रथमेश परब, सौरभ तळवडेकर,चेतन राणे,आतिष कदम आणि महाविद्यालयाचे कर्मचारी या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.