Home स्टोरी श्रीवर्धन आगाराने एसटीच्या नवीन मार्गावर सेवा वाढवाव्या! प्रवासी संघटनेच्या रिमा महामुनकर यांची...

श्रीवर्धन आगाराने एसटीच्या नवीन मार्गावर सेवा वाढवाव्या! प्रवासी संघटनेच्या रिमा महामुनकर यांची मागणी.

120

म्हसळा प्रतिनिधी (संजय खांबेटे): एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून महिलांना अर्ध्या तिकिटाने राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी शुकवार दि. १७ मार्च पासून सुरु झाली, म्हसळा शहरांत आज काही मार्गावर महिला प्रवाशानी थेट एसटी महामंडळाच्या ड्रायव्हर कंडक्टरना  पेढे वाटून धन्यवाद दिले ,एसटी महामंडळातर्फे समाजातील विविध ३० घटकांना प्रवास भाड्यात ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. आता राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे ६ कोटी ज्येष्ठ प्रवाशांनी घेतला आहे.सध्या दररोज सरासरी ५ लाखापेक्षा जास्त अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवास करतात. दरमहा ६५ ते ७० कोटी रुपये मिळतात. सध्या एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात आणि विविध योजनांमुळे महामंडळाला दिवसाला (प्रतिपूर्ती रक्कमेसह) २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. महीलांच्या प्रवासाच्या सवलतीचे परिपत्रक निघाल्यामुळे महिलांना प्रवास दरात ५० टक्क्यांची सवलत लागू होईल. त्याचाही मोठा आधार एसटी महामंडळा मिळणार आहे. ह्या मार्गावर नव्याने फेऱ्या सुरू व्हाव्या महीलांची मागणी१ )श्रीवर्धन आगारांतून श्रीवर्धन- मांदाड – मुरुड – आलिबाग,२) श्रीवर्धन -तळा- तांबडी-रोहा ,३) माणगाव आगारांतून रात्री १० नंतर म्हसळ्याकडे येण्यासाठी पहाटे २ पर्यंत गाडी नसते प्रवाशांचा आंदाज घेऊन त्या दरम्यान माणगाव स्थानकांतून जादा गाडी सोडण्यांत यावी .”रिमा महामुनकर, सदस्य प्रवासी संघटना.” श्रीवर्धन आगाराने महीलांच्या मागणीला महत्व देऊन प्रवासी फेऱ्या वाढविल्यास जंजीरा संस्थानातील श्रीवर्धन- म्हसळा तालुका जुन्या संस्थानाजवळ सलग्न होतील, आणि श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील श्रीवर्धन, म्हसळा ,तळा आणि रोहा तालुका एकत्र जोडले जाणार आहे.