Home स्टोरी श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सावंतवाडीत भाजप पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सावंतवाडीत भाजप पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

100

सावंतवाडी प्रतिनिधी: श्रीराम जन्मभूमी अयोध्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा या कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजप पक्षाच्या वतीने मोहिनी मडगावकर व महिला मोर्चा भाजप सावंतवाडी आयोजित सावंतवाडीकरांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत दिनांक २२ जानेवारी सकाळी बारा ते रात्री साडेअकरा पर्यंत कार्यक्रम असतील. कार्यक्रमाचे ठिकाण असणार आहे. भोसले उद्यान सावंतवाडी हे पार्किंग एरिया असणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे…! दुपारी बारा वाजता श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचं विधीवत पूजन करण्यात येईल. त्यानंतर सर्व नागरिकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. खास आकर्षण म्हणजे सुंदर रांगोळीचा देखावा करण्यात येणार आहे. नंतर संध्याकाळी पाच वाजल्यापासून महिला मोर्चा सावंतवाडी कडून सावंतवाडी तालुक्यातील सर्व महिलांसाठी हळदी कुंकू चा कार्यक्रम करण्यात येणार आहे. तरी सर्व महिलांनी या कार्यक्रमास सहभागी व्हायचं आहे. तसेच संध्याकाळी सात वाजता पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नंतर दीपोत्सवाचा कार्यक्रम करण्यात येईल व महिलांसाठी खास आकर्षण म्हणजे खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. पहिला बक्षीस पैठणी व इतर दोन बक्षीस दोन साड्या असणार आहेत व सर्व महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा पण घेण्यात येणार आहेत. यामध्ये विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच ऑन द स्पॉट गेम घेण्यात येतील.

सावंतवाडीकारांसाठी खास आकर्षण म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे व शेवटी युवा वर्गासाठी व सर्वांसाठी डीजेच्या तालावर डान्स करायची संधी मिळणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचा सर्वांनी जल्लोष करायचा आहे.

तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन भाजप महिला अध्यक्ष मोहिनी मडगावकर, सरचिटणीस मेघना साळगावकर, ज्योती मुद्राळे, सविता टोपले व महिला मोर्चा कडून करण्यात आले आहे.