Home स्टोरी श्रीमती बनुताई पै ग्रंथालयातर्फे स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन.

श्रीमती बनुताई पै ग्रंथालयातर्फे स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन.

89

मडुरा: भारताच्या ७८व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मडुरा येथील श्रीमती बनवताई पै. ग्रंथालय व संस्कार केंद्र यांच्यामार्फत देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल मडुरा ता. सावंतवाडी प्रशालेच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे अध्यक्षस्थान उपाध्यक्ष श्री. कृष्णा करमळकर गुरुजी यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सायली परत मॅडम, श्री बाळकृष्ण मडुरकर, श्री विजय वालावलकर, श्री नागेश सावंत, सौ सुवर्णा मडुरकर इ. उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये इयत्ता नववीतील आदिशक्ती समूहाने प्रेक्षकांची मने जिंकून प्रथम क्रमांक पटकावला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल सौ. मृणाल पंडित यांनी केले. ग्रंथालयाची यशस्वी वाटचाल व उपक्रम त्याचबरोबर ग्रंथालयाचे सद्यस्थिती याचे अवलोकन त्यांनी केले. मुख्याध्यापिका सौ.सायली परब मॅडम यांनी प्रशालेतील सर्व विद्यार्थी हे सभासद होण्यासाठी प्रयत्न करून ग्रंथालयाला शक्य ती मदत केली जाईल असे आश्वासन देऊन पुस्तकांच्या वाचनाची आवश्यकता विशद केली. अध्यक्ष स्थानावरून आ.करमळकर गुरुजी यांनी श्रीमती बनुताई पै ग्रंथालयाची स्थापना व कार्य त्याचबरोबर श्रीमती बनुताई पै यांचे जीवना बद्दल उपस्थितांना माहिती दिली. व पुस्तकांचे वाचन करावे असे आवाहन केले. या स्पर्धांचे परीक्षण आ.श्री बाळकृष्ण मडुरकर व श्री विजय वालावलकर यांनी केले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील कुमारी रिद्धी मडुरकर हिने केले तर आभार ग्रंथालयाच्या लिपिक सौ.स्नेहल सामंत यांनी केले. या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट व इयत्ता आठवी ते दहावी मोठा गट या दोन गटात घेण्यात आल्या. विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. श्रीमती बनुताई पै ग्रंथालय व संस्कार केंद्र मडुरा च्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.