सावंतवाडी प्रतिनिधी: जीवनविद्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा मुंबई येथे रविवारी पार पडला थोर समाज सुधारक सद्गुरु श्री. वामनराव पै. यांनी निर्माण केलेल्या जीवन विधेच्या तत्त्वज्ञाने आपल्या जीवनात सकारात्मक बदल करू शकतो कुमारी श्रद्धा संतोष चीले हीने आपल्या अभ्यासा बरोबर जीवन विधेचे विचार पण आत्मसात केले. ती श्री रवळनाथ विद्या मंदिर ओटवणे या हायस्कूल येथे शिकत होती तिला दहावी मद्धे ९४. ६० टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तिच्या या उतुंग यशाची दखल घेऊन जीवनविद्या या ट्रस्टीने श्री. प्रल्हाद (दादा) पै.यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थाना सन्मानचीन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कुमारी श्रद्धा चीले हीने जीवन विद्या मिशन ट्रस्ट आणि प्रल्हाद दादा यांचे आभार मानले. तसेच आपल्याला लाभलेले सर्व शिक्षक आणि श्री. दशरथ श्रृंगारे सर यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.