Home स्टोरी शेती बागायती हे शाश्वत रोजगाराचे एकमेव साधन..! व्ही. एम. नाईक

शेती बागायती हे शाश्वत रोजगाराचे एकमेव साधन..! व्ही. एम. नाईक

96

ओटवणे प्रतिनिधी: शेती बागायती हे शाश्वत रोजगाराचे एकमेव साधन आहे. शेतकऱ्यांनी शेती बागायतीचे प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक यंत्रसामग्रीसह त्याला कष्टाची जोड दिल्यास आर्थिक उन्नती निश्चित आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांच्या उत्पादकता वाढवून शेतीपूरक व्यवसाय केल्यास आपल्यासह परिसराचा सर्वांगीण विकास शक्य आहे असे प्रतिपादन सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ जयंतीच्या कृषी दिनानिमित्त सावंतवाडी पंचायत समिती आणि भालावल ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी भालावल येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना व्ही एम नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ अजय मुंज, उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी मंगेश जाधव, सावंतवाडी तालुका सावंतवाडी तालुका कृषि अधिकारी युवराज भुईंबर, भालावल सरपंच समीर परब, उपसरपंच अर्जुन परब, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र परब, ओटवणे सरपंच दाजी गावकर, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, सरमळे सरपंच विजय गावडे, तांबोळी सरपंचा सौ नाईक, चराठा सरपंचा प्रचिती कुबल, मंडळ कृषी अधिकारी राजाराम शिंदे मंडळ.आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भालावल प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेली वृक्षदिंडी खास आकर्षण ठरले, तसेच भालावल गावातील धनगर समाज बांधवांनी सादर केलेले चप्पल नृत्य लक्षवेधी ठरले. या वृक्षदिंडीसह चपई नृत्याचे मान्यवरांनी कौतुक करीत त्यांचा सन्मान केला. यावेळी श्री पद्धतीने भात लागवडीबाबत प्रात्यक्षिकासहीत मार्गदर्शन करण्यात आले तसेच मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पोपटराव पाटील यांनी सध्या रोजगार कमी होत चालला असून यावर शेती हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शेतीकडे वळण्याची गरज आहे. परंतु आधुनिकीकरणाच्या काळात यंत्राबरोबरच स्वतः राबले तरच शेती फायदेशीर असल्याचे सांगितले. तर अजय मुंज यांनी काजू पिकावरील कीटक रोगाबाबत सविस्तर मार्गदर्शन करून कीटकनाशके आवश्यक आहेतच परंतु कीटकनाशकाचा अनावश्यक वापर टाळावा असे आवाहन केले. यावेळी प्रमोद दळवी यांनी विदेशी व्हिएतनाम फणस लागवडी बाबत मार्गदर्शन केले. तर शिवप्रसाद देसाई यांनी शेतकरी आणि बागायतदारांनी जास्त उत्पादनाचा हव्यास न बाळगता संशोधक व चौकस वृत्ती जोपासून लागवडीतून उत्पादन घेतल्यास गुणात्मक उत्पादन मिळत असल्याचे सांगितले.

यावेळी बायोगॅस विकास कार्यक्रम, मनरेगा अंतर्गत उल्लेखनीय कार्य केलेल्या ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, कृषी सहाय्यक, आणि शेतकरी, बागायतदार लक्ष्मी परब, वामन परब धोंडू कोकरे, उज्वला परब, अश्विनी परब, चंद्रकांत परब, विठ्ठल कोकरे, भालचंद्र कोकरे, वसंत परब, विजय परब, शांताराम परब, उदय परब, अर्जुन परब, ग्रामसेवक श्रीरंग जाधव, सहदेव राऊळ, लीना मोर्ये, भरत बुंदे, नागेश मेस्त्री, अनुजा देसाई, सिद्धेश गोसावी, कृषी सहाय्यक पूनम देसाई, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी सत्कार म्हणून प्रगतशील बागायतदार प्रमोद दळवी, शिवप्रसाद देसाई, सदानंद गवस, ग्रामपंचायत सदस्य सुमित्रा परब, मंदा गावडे, माधवी, गुळेकर, वृषाली परब, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश परब, देवस्थान कमिटी अध्यक्ष अशोक परब, पोलीस पाटील नम्रता कोनशिकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी निवृत्त कृषी अधिकारी काका परब, शरद सावंत, कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे, तांबोळी माजी सरपंच अभिलाष देसाई, राजाराम दळवी, प्रदीप सावंत, गंगाराम परब एकनाथ सावंत, प्रकाश मोरे, संजय शेळके, उद्देश सावंत, ग्रामसेविका तृप्ती राणे, अर्जुन कुबल, श्रीधर राऊळ, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कोठावळे, सुधीर पाटील, विजय पाटील, सुषमा देसाई, छाया राऊळ, तलाठी श्री अहिरे आदींसह तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि भालावल परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सावंतवाडी पंचायत समितीचे प्रशांत चव्हाण यांनी केले.