Home क्राईम शेतात कोणतेही फळपीक नसताना ‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजने’त सहभाग! चौकशीदरम्यान...

शेतात कोणतेही फळपीक नसताना ‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजने’त सहभाग! चौकशीदरम्यान आढळली साडेसात हजार बोगस प्रकरणे

76

शेतात कोणतेही फळपीक नसताना ‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजने’त सहभाग घेतल्याची साडेसात हजार बोगस प्रकरणे चौकशीदरम्यान आढळली आहेत.यातील विमाधारकांची साडेआठ कोटी रुपयांची विमा हप्ता रक्कम जप्त करण्यात आली आहे. बोगस प्रकरणांमध्ये सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे.फळपीक विमा योजनेत कोट्यवधी रुपयांचा गैरप्रकार होत असल्याचा संशय आल्यामुळे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी चौकशीचे आदेश दिले होते.त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी अॅर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांच्या मदतीने राज्यभर पथके तयार करण्यात आली. या पथकांनी राज्यातील विमा संरक्षित फळबागांपैकी संशयास्पद बागांची तपासणी केली.काही ठिकाणी नियोजनबद्ध गैरप्रकार आढळून आले आहेत. शेतकऱ्यांना फसवून खोट्या माहितीच्या आधारे परस्पर विमा उतरविण्यात आल्याचे काही गावांमध्ये आढळले आहे.मात्र, त्यात शेतकऱ्यांनाही अडकविण्यात आल्याने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत.